
शेतकऱ्याची मुलगी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी गटातून राज्यात प्रथम,
शेतकऱ्याची मुलगी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी गटातून राज्यात प्रथम, काटोल तालुक्यातील मूर्ति निवासी राब राब राबून शेती करणाऱ्या मोहन मुन्ने शेतकऱ्याची मुलगी महाराष्ट्र लोक सेवा आयोग च्या परीक्षेत ओबीसी महिला गटातून राज्यात प्रथम आली नुकत्याच पार पडलेल्या MPSC महाराष्ट्र लोक सेवा आयोग च्या परीक्षेत ओबीसी महिला वर्गातून काटोल तालुक्यातील मूर्तिचे सरपंच आणि शेतकरी मोहन मुन्ने यांची कन्या अंजली मोहन मुन्ने नी अनुक्रमे 273गुण घेऊन राज्यातून प्रथम आल्याने राज्यात आणि जिल्यात, व तालूक्यात अंजली मुन्ने चे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. ती आपले श्रेय आई, वडील यांना देत असून आईने दिलेल्या संस्कारातून वाढली आहे. आई, बाबांच्या मार्गदर्शनाणे मला महाराष्ट्र लोक सेवा आयोगा च्या परीक्षेत ध्येय गाठता आले, आणि राज्यातील सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. अंजली ही सामान्य घराण्यातील शेतकरी कुटूंबात असून तिचे शिक्षण मोठया कॉन्व्हेंट झाले नसून जिल्हा परिषद शाळा मूर्ती तर पुढील शिक्षण काटोल ला झाले आहे.आज शिक्षणाच्या स्पधेत ग्रामीण भागातील मुले सुद्धा मागे नाही. आपली जिद्द आणि विश्वासाने ने कोणतेही ध्येय गाठता येते.आई, वडिलांचे, संस्कार, गुरुजनांचा आशीर्वादाने कोणते काम पूर्णत्वास नेऊ शकतो. असा विश्वास अंजली मुन्ने दर्शविला
