बेलोना नगरीत दोन दिवस करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

बेलोना नगरीत दोन दिवस करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

19फेब्रुवारीला शिव गर्जना ढोल ताशा पथक नी केले महावादन दिली मान वंदना.

20फेब्रुवारीला गावातील आखाडा व्यायाम शाळा मंडळ यांचे लाठी काठी आगीचे कला कौशल्यत निघाली भव्य मिरवणूक

बेलोना प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के.:महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेलोना नगरतीत 19 फेब्रुवारीला सकाळी बसस्टँड वरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक लक्ष्मणजी नासरे ,सौ.नीमजे पोलीस पाटील , सरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती , शिव गर्जना ढोल ताशा पथक, पवनसुत ढोल ताशा पथक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, तरुण मित्र मंडळी गावकरी जनतेनी केले पूजन. शिव गर्जना ढोल ताशा पथक मधील तुषार अदासे आनंद सातपुते यांनी महाराजांना दिली मांनवंदना . ब्यांक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रक्तदान शिबिर आयोजित करून महाप्रसाद  वितरित करण्यात आला . बाबुर पुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे केले पूजन.  माहावादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली मानवंदना. बाबुरपूरा येथे महाप्रसाद आलुभात वितरित करण्यात आला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व गावातील तरुण मित्र मंडळी यांनी नोकरीला लागलेल्या मुलांच्या आई वडिलांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन केला त्यांचा सत्कार.20फेब्रुवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी गजानन महाराजांच्या मंदिरातून निरंजन बरोले याला महाराजांची वेशाबुषा घालून घोड्यावरून बसून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सोबत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागद्वार भजन मंडळ मानिकवाडा,बेलोना येथील अमोल खंडारे ब्यांड तसेच या मिरवणुकीत सर्वांचे आकर्षण आणि सर्वांचे मने जिंकणारे . अखडा व्यायाम शाळा मंडळ मधील चंचल लेभांडे, लावन्य धोटे,समृध्दी दिवाण यांनी लाठी काठी फिरवून तसेच सचिन ठोंबरे ,प्रणय लेंभाडे,सहील शेख ,राजेश डफरे,सुभाष लेंभाडे, सतीश दिवाण ,प्रशांत बांबल,राकेश थोटे,राहील शेख,यश गाजबे, गोलू मस्के ,यांनी लाठी काठी आगीचे कला कौशल्य सादर केले तर झेंडा पुरा येथे महाप्रसाद दूध वितरित करण्यात आले .ही मिरवणूक दिवाण पुरा, झेंडा पुरा ,ब्यांक चौक, बाजार चौक,भवानी पुरा, मोठी विहीर येथून फिरवत बस स्टँड येथे येऊन भजन मंडल ब्यांड पार्टी आखाडा व्यायाम शाळा मंडळ यांना मानपान व अल्पोआहर देऊन मिरवणुकीचा व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .या कार्यक्रमासाठी विशेष मोवाड आणि नरखेड येथील पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच गावातील तरुण मित्र मंडळी , प्रतिष्ठित व्यक्ती गावकऱ्यांनी मोठे सहकार्य दिले . या दोन दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा प्रथमच गावात कार्यक्रम गावकऱ्यांना पाहायला मिळाला .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close