एक सारख्या नावामुळे पोलिसांनी केली नको ती घोडचूक चोर सोडून संन्याशाला फाशी

कानपूर |  :2021 मध्ये कुष्मांडा नगर येथील रहिवासी प्रमोद कुमार याला पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याखाली तुरुंगात पाठवले होते. जामीनावर सुटल्यानंतर प्रमोदकुमार संखवार हा आरोपी या खटल्यात समन्स बजावूनही न्यायालयात हजर होत नव्हता. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभागाने 24 ऑगस्ट 2023 रोजी प्रमोद कुमार (संखवार) विरुद्ध जारी केले. त्यानंतर 12 सप्टेंबर 2023 रोजी इन्स्पेक्टर शुभम सिंह आणि हेड कॉन्स्टेबल राज किशोर यांनी प्रमोद कुमार संखवार याच्या जागी प्रमोद कुमार (साहू) याला पकडले. आणइ त्याला वॉरंटी देऊन तुरुंगात पाठवले. प्रमोद साहू हा बसंत विहार घाटमपूर येथील रहिवासी असून त्याच्या भावाचासह काम करतो.

तुम्ही समजता तो मी नाही

22 सप्टेंबर रोजी प्रमोद कुमार साहू याची जामीनावर सुटका झाली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर प्रमोद कुमार साहू याने कमिश्नरकडे जाऊन तक्रार नोंदवली. अटक करून पोलिस त्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले. तुझं नाव प्रमोद कुमार आहे, तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पत्नीला मारहाण केल्याचा आरोपही तुझ्यावर आहे. हे सगळं ऐकल्यावर मी ती व्यक्ती नाही, हे मी पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. माझे वडील जिवंत आहेत , माझी बायको माहेरी गेली आहे, याचे सगळे पुरावे मी त्यांना दिले. मी कधीच जेलमध्ये गेलो नाही, हे पटवून देण्याचाही मी खूप प्रयत्न केला, पण पोलिसांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि मला तुरूंगात पाठवलं, असं फिर्यादीने नमूद केलं.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे कानपूरचे सह पोलीस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close