
जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच थेट केलं
मुंबई | मुंबईतील या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. 15 ऑक्टोबरच्या रात्री एका 28 वर्षांच्या तरूणाने 21 वर्षांच्या पीडितेवर जीवघेणा हल्ला केला. त्याने तिच्या गळ्यावर वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित आरोपी आणि 21 वर्षीय पीडित तरुणी 2019 पासून एकमेकांना ओळखतात आणि ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर त्या मुलीला त्याच्यासोबत नात्यात राहण्याची इच्छा नव्हती. तिने त्याल तसं सांगितलंही , मात्र त्या तरूणीचा नकार त्याला पचवता आला नाही. हे नातं कायम राखलं नाही तर तुझे व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करेन, अशी धमकी त्याने तरूणीला दिली. आरोपी आणि पीडित तरूणी हे दोघेही जवळपास रहायचे असे समजते15 ऑक्टोबर रोजी त्या दोघांनीही शेवटचं भेटायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते भेटले, त्यांनी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये रूमही बूक केली. मात्र तेथे त्या तरूणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप लावण्यात आला आहे. त्यानंतर दोघेही तेथून एका रिक्षात बसून भांडूपच्या दिशेने निघाले. गांधीनगर जवळ त्या तरूणाने तरूणीच्या गळ्यावर वार करत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.Live Cricket
Live Share Market


