चालत्या कॅबमध्ये एका तरूणीचा विनयभंग उघडकीस आल्यावर संपूर्ण शहर हादरलं

मुंबई  ;    नवी मुंबई परिसरामधील एका कंपनीमध्ये काम करणारी तरुणी तीन दिवसांपूर्वी काम आटपूर रात्रीच्या सुमारासा घरी जात होती. कल्याण येथे जाण्यासाठी तिने कॅब बूक केली. प्रवास सुरू झाल्यावर काही वेळ सगंळ ठीक होतं. मात्र थोड्या वेळाने सूनसान रस्ता आल्यानंतर कॅब चालकाने अचानक हालचाल करत पीडित तरूणीचा विनयभंग केला. यामुळे ती अतिशय भेदरली होती. मात्र आजूबाजूला कोणीच नसल्याने ती गप्प राहिली.

थोड्या वेळाने कॅब मुख्य रस्त्यावर आल्यावर त्या तरूणीने अचानक आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. ते ऐकताच कॅब चालकाने तिला सूचक नाका येथे कॅबमधून खाली उतरवले आणि तो तेथून फरार झाला. पीडित तरूणी कशीबशी घरी पोहोचली. घरी आल्यावर कुटुंबियांना तिने सर्व प्रकार सांगितला. घरच्यांनी धीर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पोलिसांकडे गेली आणि घडलेली सगळी घटना सांगितली. याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कल्याण कोळसवाडी पोलिसांनी विविध टीम बनवल्या आणि पीडित तरूणीलोबत हे कृत्य करणाऱ्या कॅब चालकाचा कसून शोध सुरू केला. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारो पोलिसांच्या एका पथकाने नवी मुंबईतील नेरूळ येथे राकेश जयस्वाल या आरोपी कॅब चालकाला अटक केली. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याने यापूर्वीही असा गुन्हा केला आहे का, आणखी कोणत्याही महिलेसोबत असे कृत्य केले आहे का याचा शोध कल्याण कोळसेवाडी पोलीस घेत आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close