दारूच्या नशेत मित्रांमध्ये भांडण झाल्याने अघटित घडलं.कुटुंबाला त्यांचा तरणाबांड मुलगा गमवावा लागला.

पिंपरी | :पिंपरी -चिंचवड येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. सूरज उर्फ जंजीर कांबळे असे मृत तरूणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सूरज हा त्याचे मित्र पंकज पाचपिंडे आणि अमरदीप उर्फ लखन जोगदंड यांना भेटला. ते तिघेही एकत्र दारू प्यायला बसले होते. बराच वेळ गप्पा मारत-मारत त्यांचे मद्यपान सुरू होते. मात्र थोड्या वेळाने त्यांना ते मद्य चढले. त्याच नशेत त्यांचं भांडण झालाय रागाच्या भरात मयत सूरज याने पंकज आणि अमरदीप या दोघांना शिवीगाळ केली. आई-बहिणीवरून शिवीगळा करत त्याने अपशब्दही वापरले.याचा त्या दोघांना प्रचंड राग आला. संतापाच्या भरात पंकज आणि अमरदीपने सूरजच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सूरजचा जागीच मृत्यू झाला. नशा उतरल्यावर आपण काय करून बसलो, ते इतर दोघांना समजले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांच्या मित्राचा जीव आधीच गेला होता. हा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून पंकज आणि अमरदीपने सूरजचा मृतदेह कपड्यात गुंडाळला आणि बावधन येथील नाल्यात फेकून दिला. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. बीड येथील आंबेजोगाई या त्यांच्या मूळगावी जाऊन ते लपले.सूरजच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर वाकड पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींनी शोधले आणि त्यांच्या मुसक्या आवळत अटक केली. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित तपास सुरू आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close