
डोळंबा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त वृक्ष वाटप
अनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :दिग्रस तालुक्यातील डोळंबा येथे १४ ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना वृक्ष भेट देण्यात आले.या कार्यक्रमाचे
प्रमुख वक्ते निलेश जाधव होते
“झाडे नाही तर जीवन नाही
म्हणून एकत्र येऊ या चला झाडे लावू या”उपक्रमांतर्गत महाज्योती ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना झाडाचे वाटप केले ऋषिकेश जाधव यांनी उपस्थितत्यांना झाडाचे महत्व सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजल जाधव यांनी केले. तर विजय पाटील यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाबद्दल माहिती दिली रुपेश काटकर यांनी महाज्योती ग्रंथालयास बिबा हा कवितासंग्रह भेट दिला.निलेश जाधव यांच्या संकल्पनेतून १४ ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.”झाडे नाही तर जीवन नाही म्हणून एकत्र येऊया चला झाडे लावू या” या अनोख्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी उपसरपंच पपीता ताई जाधव, किशोर जाधव, ग्राम पंचायत सदस्य संजय राऊत,पवन भगत, हंसराज वानखडे, प्रवीण रामटेके, निर्मिक ब्राह्मणे,धम्मपाल भगत, योगेश गावंडे व गावातील नागरिकानी मोठ्या संख्येने हजेरी लावली.



