उंदराला  मारणारा तरून अटकेत

उंदराला  मारणारा तरून अटकेत

विकेंद्र शर्मा सामाजिक कार्यकर्त्याची दखल !

उत्तर प्रदेशातून  एक विचित्र घटना समोर आली आहे. बदायू येथे एका तरुणाने उंदराचा जीव  घेतला, त्यावरुन पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे. तर याप्रकरणातील आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या उंदराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे शवविच्छेदन  करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. एका तरुणाने अटक केलेल्या तरुणाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, हा तरुण उंदराच्या जीवाशी खेळत होता. त्याने त्याला बांधून एका नाल्यात डुबवित होता. हा प्रकार सुरु असताना तरुणाने त्याला विरोध केला. पण आरोपी थांबला नाही. तो उंदराच्या जीवाशी खेळतच होता.विरोध केल्यानंतरही आरोपीने कहर केला. आरोपीने एका फरशीच्या तुकड्याला बांधलेल्या उंदराला नाल्यात फेकून दिले. त्यामुळे हा उंदीर मृत झाला. उंदराच्या मृत्यूला हा आरोपीच दोषी असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.विकेंद्र शर्मा या तरुणाने आरोपी मनोज कुमारविरोधात तक्रार दिली होती. शर्मा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आरोपीला त्यांनी उंदराला सोडण्याची विनंती केली होती. पण आरोपीने त्यांना प्रतिसाद न देता त्याचा जीव घेतला. त्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी प्रकरणात प्राणी क्रुरता अधिनियमानुसार, गुन्हा दाखल केला आहे. तर उंदराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे पोर्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधारे पोलिसांना आरोपीविरोधात पुरावा गोळा करता येणार आहे. आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीने उंदराला सोडण्याऐवजी नाल्यात फेकून दिले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close