साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

अहमदनगर |   एका बंगल्यात रिलॅक्स नावाच्या स्पा सेंटरमध्ये गैरकृत्य सुरु होते. पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या धडाकेबाज कारवाईतून दोन परराज्यातील पीडित तरुणींची सुटका केलीय.

या प्रकरणातील फरार आरोपी गणेश कानडे याच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आलीय. गणेश कानडे हा याआधीदेखील देहविक्रीच्या प्रकरणातील आरोपी आहे. त्याची शिर्डीत दहशत आहे. तो पोलीस पकडतील या भीतीने वारंवार सीमकार्ड बदलतो. तसेच परराज्यातील किंवा मुंबई आणि नाशिक येथील मुलींना आणून स्पा सेंटरच्या नावाने सेक्स रॅकेट चालवतो. आरोपी गणेस कानडे हा पोलिसांना चकवा देत राहतो. तो चोरुन ग्राहकांशी संपर्क साधायचा आणि ग्राहकांना हॉटेलमध्ये मुली पुरवायचा. त्याच्या या कूकृत्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांना मिळाली.उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी त्यांच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ग्राहक म्हणून अहमदनगर-मनमाड रोडच्या लगत असलेल्या बंगल्यात रिलॅक्स नावाच्या स्पा सेंटरमध्ये पाठवलं. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात पकडलं. तसेच या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार जिथे सुरु होता तो बंगला शिर्डी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर होता. या बंगल्यात लाईट्सचा चांगलाच झगमगाट होता, अशीदेखील माहिती समोर आलीय. पोलीस सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या शोधात आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close