देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे ईमेल हॅक,
October 6, 2023
65 Less than a minute
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा मेल हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ईमेल हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपीने ईमेल हॅक करुन विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश काढला. पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्याला अटक करण्यात आलीय. आरोपीने अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढल्याची माहिती तपासातून समोर आलीय.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा गैरवापर करुन ईमेल आयडी हॅक करुन बनावट आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला अटक केली आहे. आरोपीने बदलीचे बनावट आदेश काढल्याचं तपासात उघड झालंय. आरोपीने बनावट आदेश काढून लोकांकडून पैसे उकळल्याचं समोर आलंय.