नारीशक्तीचा जागर… महिलांच्या लेखणीतून उतरलेला आगळावेगळा दिवाळी अंक

नारीशक्तीचा जागर... महिलांच्या लेखणीतून उतरलेला आगळावेगळा दिवाळी अंकनागपूर | दिवाळीचा उत्सव प्रचंड जल्लोषात सुरू आहे. प्रत्येकजण दिवाळीचा आनंद आपआपल्या पद्धतीने लुटताना दिसत आहे. दिवाळी निमित्ताने अजूनही खरेदी केली जात आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. दिवाळी म्हटल्यावर जशी दिव्यांची रोषणाई, सुंदर रांगोळ्या आणि फराळाची रेलचेल असते तशीच लेखक, कवी आणि वाचकांना उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवाळी अंक बाजारात आले आहेत. वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले हे दिवाळी अंक आहे. त्यातील एका दिवाळी अंकाची सर्वांनाच उत्सुकता आहे. खास महिलांनी तयार केलेला हा दिवाळी अंक आहे.

या दिवाळी अंकाचे प्रकाशन अजिता देशमुख यांच्या हस्ते होईल. तर या प्रकाशन सोहळ्याचे निवेदन प्राजक्ता बर्वे करणार आहेत. पाहुण्यांचा परिचय डॉ. मानसी मोहरील करतील. तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी पल्लवी शिंदे माने यांच्यावर असणार आहे. या दिवाळी अंकाच्या संपादिका सायली अक्षय देशपांडे असून अक्षय देशपांडे हे संचालक आहेत. अतिथी संपादक म्हणून सुषमा देशपांडे- मुलमुले यांनी दिवाळी अंकाचं काम पाहिलंय. अनेक कथा आणि विविध लेखांनी सजलेला हा दिवाळी अंक नक्कीच वाचकांना आवडेल असा विश्वास सायली देशपांडे यांनी व्यक्त केला.ती चं पान हे मासिक आहे. दर महिन्याला त्याचे ऑनलाईन प्रकाशन होत असतं. तर दरवर्षी मार्चमध्ये ती चं पान या मासिकाचा वार्षिक अंक काढला जातो. तो प्रिंट स्वरुपात मिळतो. आजवर ती चं पान चे दोन वार्षिक अंक प्रकाशित झाले आहेत. पहिला वार्षिक अंक नागपुरातील ज्येष्ठ स्त्री साहित्यिक आशा पांडे आणि डॉ. प्रज्ञा आपटे यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close