चहा न मिळाल्याने डॉक्टर निघून गेले, आता…

नागपूर | चहाची तल्लफ किती धोकायदायक आहे, हे एका डॉक्टराने नागपूर जिल्ह्यात दाखवून दिले. या डॉक्टराने चहा मिळाला नाही म्हणून चार महिनांना भूल देऊन शस्त्रक्रिया करणे सोडून दिले. नागपूर जिल्ह्यात झालेल्या या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. नागपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. आता डॉक्टराला नोटीस बजावली आहे.नागपूर जिल्ह्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. डॉ. तेजराम भलावे हे नऊ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणार होते. डॉ. भलावी यांनी नऊ पैकी पाच शस्त्रक्रिया केल्या. चार महिलांच्या शस्त्रक्रिया बाकी होत्या. त्यावेळी त्यांना चहा अन् बिस्कीट हवे होते. चहा न मिळाल्यामुळे त्यांनी चार महिलांची शस्त्रक्रिया न करता काढता पाय घेतला गेला. विशेष म्हणजे या चार महिलांना भूलचे इंजेक्शन त्यांनी दिले होते. या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना कळवल्यानंतर तातडीने दुसरा डॉक्टरांना पाठवण्यात आले. त्यानंतर चार महिलांवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.चहा दिला नाही म्हणून अर्ध्यावरच शस्त्रक्रिया सोडणाऱ्या डॉक्टर भलावी यांना नोटीस बजावली आहे. नागपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी नोटीस बजावली आहे. कुटुंबनियोजन शस्रक्रिया अर्ध्यावर का सोडल्या? याबाबत खुलासा करण्याचे आदेश नोटीसमधून दिला आहे. भूल दिलेल्या चार महिलांच्या शस्रक्रिया सोडून डॅाक्टर गेल्याची बातमी  दाखवली होती. त्याची दखल घेत ही नोटीस दिली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना भूलचे इंजेक्शन देऊन चहा न मिळाल्याने नाराज झालेल्या डॉक्टरवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close