
पोलीस पाटील यांचा खून
कोल्हापूर – शेतीच्या वाद सोडवायला गेलेल्या पोलीस पाटील यांचा खून
झाला वृत्त असे कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून शेतामुळे दोन कुटुंबामध्ये वाद होत होता. भांडण सोडवण्यासाठी केलेल्या पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संदीप ज्ञानदेव पाटील असं पोलिस पाटील यांचं नाव होतं. संशयित चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिस पाटलांवरती ज्या ठिकाणी हल्ला झाला. त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांना )घटनास्थळी ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्या त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत.
Live Cricket
Live Share Market