
तलाठी व मंडळाधिकारी लाच घेताना जाळात
तलाठी व मंडळाधिकारी लाच घेताना जाळात
काटोल शहरातील लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई करीत मंडळ अधिकारी व तलाठी यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेण्याची घटना 28 जून रोजी घडली.
नरखेड तालुक्यातील जलालखेडा तहसील कार्यालय येथे मंडळ अधिकारी व तलाठी कार्यरत असून शेताच्या फेरफार करिता पाच हजार रुपयाची मागणी थंडीपवनी येथील शेतकरी यांच्याकडून केली होती यांच्याकडून वारंवार पैशाच्या मागणीमुळे लाचलुचपत विभागाच्या शेतकऱ्यांनी संपर्क केला आणि लाच लुचपत विभागाचे अधिकारी यांनी सापळा रचून मंडळ अधिकारी व तलाठी यांना रंगे हात पकडले आशिष चंद्रमणी धनविजय 38 वर्धमान नगर नागपूर अशी मंडळ अधिकारी याचे नाव असून तर अनिकेत रवींद्र वाहने 31 तलाठी याचे नाव आहे. दोन्ही कर्मचारी यांना ताब्यात घेतली असून काटोल पोलीस स्टेशन येथे नागपूर च्या लाचलुचपत विभागाच्या टीमने कारवाई केली. ही कारवाई राहुल माकनिकर पोलीस अधीक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनामिका मिर्जापुरे उपअधीक्षक यांनी केली



