
जीवनविकास एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक कार्याध्यक्ष शिक्षणमहर्षी श्री बाबुरावजी झाडे यांचे अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न.
नागपूर . जिवनविकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कार्याध्यक्ष शिक्षणमहर्षी बाबुरावजी झाडे ह्यांच्या वयाच्या 85 व्या वर्षी संस्थेच्या नवप्रतिभा हायस्कूल, आयुर्वेदिक – ले-आउट सक्करदरा, नागपूरचे प्रांगणात त्यांचे अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मुंबईचे शिक्षक आमदार, शिक्षकभारती या संघटनेचे अध्यक्ष कपिल पाटील यांचे हस्ते झाले. समारंभाचे अध्यक्षस्तानी संस्थेचे अध्यक्ष व वर्ध्याचे खासदार रामदासजी तडस हे होते. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून आमदार विकास ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, माजीमंत्री विनोद गुडधे पाटील, माजी आमदार एस.क्यू.जमा, देवरावजी रडके, माजी महापौर दयाशंकर तिवारी हे उपस्थित होते तर विशेष उपस्थितीत माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, माजी नगरसेवक संजय महाकालकर, शिक्षक महामंडळाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस, प्रा.रमेश पिसे, काँग्रेसचे नेते, आर.एम.खान नायडू, जनता दल यु.चे अतुल देशमुख अनिल साठोने, दीपक चाफले, विनोद.गिल्लुरकर, भाऊ पत्रे, किशोर वरभे, विलास गभने, भारत रेहपाडे, सपन नेहरोत्रा, संजय खेडीकर प्रामुख्याने हजर होते. याप्रसंगी मूर्तिकार प्रशांत वलिवकर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाबुरावजी झाडे याचे जीवनावर आधारित” अजुनी चाळतोची वाट” हे बळवंत मोरघडे व डॉ. देवमन कामडी यांनी शब्दांकन केलेले पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आमदार कपिल पाटील म्हणाले, बाबुरावजी यांचे शिक्षण, राजकीय, सामाजिक क्षेत्रात फार मोठे काम असून त्यांचे पुतळ्यापासून अनेक तरुण त्यांचे परिश्रम, संघटन कौशल्य, व कुशल प्रशासन याची प्रेरणा घेऊन समाजात कार्य करतील. हे सर्वासाठी शक्तीस्थळ असेल असे वाटते. याप्रसंगी अध्यक्ष रामदास तडस हे म्हणाले की, श्री बाबुरावजी यांनी खेड्यातून येवून 1960 साली वयाच्या 20 वर्षी जीवनविकास एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून अवघे 5 विद्यार्थी घेऊन शाळा सुरू केली. आता 5000 विद्यार्थी शिकतात. त्यांचे संस्थे अंतर्गत आता 16 शैक्षणिक युनिट कार्यरत आहेत. त्यांचे संस्थेत केजी ते पिजी पर्यंत शिक्षण दिल्या जाते. त्यांचे सर्व शाळा गरीब, कामगार, शेतकरी, शेतमजूर याचे मुलासाठी आहेत. संस्थेत त्यांनी आतापर्यंत 400 ते 500 शेतकरी, व गरिबांचे मुलांना नोकरीत संधी देऊन त्यांचे संसार बसविलेत. शिक्षकांचे सहकार्यातून संस्थेच्या नावाने शाळा बाधल्यात, स्वतःचे नावाने संपत्ती जमा केली नाही. स्वतः मात्र चार रूमचे फ्लॅट मध्ये राहतात. हे फार समाज उपयोगी कार्य केले असून ते खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी आहेत. ज्या ठिकाणीपुतळा स्थापित केले त्यास “प्रेरणास्थळ” हे नाव दिले असून, या त्याचे प्रतीमे पासून अनेक, पिढ्या प्रेरणा घेतली. येवढे मोठे कार्य त्यांचे आहे. याची देही, याची डोळा, या संकल्पनेतून जिवंत असतानाच आपला पुतळा उभारून आपले सुख आपले डोळ्यानी अनुभवने ऐवढा आनंद नाही अशी भावना श्री बाबुरावजी झाडे यांनी व्यक्त केली.
