शेडमधून कांद्याच्या 85 गोण्यांची चोरी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
November 1, 2023
58 Less than a minute
अहमदनगर | 1 नोव्हेंबर 2023 : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी बाबासाहेब खैरनार यांना चोपीमुयळे मोठा फटका बसला आहे. खैरनार यांनी एम के यांच्या शेडमध्ये कांद्याच्या जवळपास 1070 गोणी ठेवल्या होत्या. मात्र मंगळवारी रात्री उशीराच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एक, दोन नव्हे तर तब्बल 85 गोणी कांदा घेऊन पोबारा केला. एवढेच नव्हे तर वीस ते बावीस गोण्या शेडजवळ रस्त्याच्या पलीकडे सोडून चोरांनी धूम ठोकली. याप्रकरणी कांदा व्यापारी बाबासाहेब खैरनार यांनी कोपरगाव तालुका पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. आणि पोलिसांनी या कांदाचोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.चारशे वाहनातून आलेल्या कांद्याला जास्तीत जास्त 5200 रुपये, कमीतकमी 2000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल ला बाजार भाव मिळाला. गेल्या आठवड्यात 5820 रुपये इतका उच्चांकी गेलेला कांदा या आठवड्यात 4700 गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याला 1100 रुपये प्रति क्विंटल मागे तोटा सहन करावा लागला असल्याने कांद्यावरील सर्व निर्बंध रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.