अंबाझरी तलावात उडी मारून ३ वर्षाच्या चिमुकलीसह आईची आत्महत्या

 नागपूर  : नागपूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक कलहातून एका विवाहित महिलेने  आपल्या  तीन वर्षांचा चिमुकलीसह अंबाझरी तलावात उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. कल्पना पंडागळे असं विवाहित महिलेचं नाव आहे.  मृतदेह बाहेर काढल्यानंतर तीन वर्षाची चिमुकली आईच्या छातीला कवटाळलेला अवस्थेत होता, हे दृश्य बघून सर्वांचे डोळे पाणावले.माहिती मिळताच .पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह तलावाच्या बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी  पाठवले आत्महत्येपूर्वी कल्पनाने आपल्या पतीला एक संदेश पाठवला होती. ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल, शेवटी एकदा मुलीचा चेहरा बघायचा असेल तर सांग’ असा मेसेज तिने आपल्या पतीला केला होता. त्यानंतर ती सोमवारी रात्री ती मुलीला घेऊन अंबाझरी तलावावर आली. तलावावर आल्यानंतर काठावर बसून तिने लेकीला खाऊ घातलं. त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन पाण्यात उडी घेतली. घटनास्थळी एक चिठ्ठी आढळून आली होती. यामध्ये आई, पती आणि भावाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close