मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना उडवले

 पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरवासींना शुक्रवारी रात्री 2012 मध्ये घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण आली. एका मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. रस्त्यावरुन चालणाऱ्या पदचाऱ्यांना धडक दिली. यामुळे पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ थरकाप उडाला. नारायण पेठ पोलीस चौकीकडून चार चाकी वाहन झेड ब्रिजकडे जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. दरम्यान, मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे येथील उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) आणि नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) हे दोघे शुक्रवारी रात्री चार चाकी वाहनाने नारायण पेठ पोलीस चौककडून झेड ब्रिजकडे जात होते. दोघांनी मद्य प्राशन केले होते. त्यातील उमेश वाघमारे गाडी चालवत होता. भरधाव वेगाने गाडी चालवत त्याने रस्त्यावरील वाहनांना धडक देणे सुरु केले. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या पदचाऱ्यांनाही धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तसेच चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close