सिन्नर-शिर्डी    मार्गावर भीषण अपघात  10 जणांचा मृत्यू   तर  15 ते 20 जण जखमी

 

      सिन्नर-शिर्डी    मार्गावर भीषण अपघात  10 जणांचा मृत्यू   तर  15 ते 20 जण जखमी झाले

नाशिक जिल्हा  सिन्नर तालुक्यातील  वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात झाला .या अपघातात  खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झालेल्याने     10 जणांचा मृत्यू झाला आहे.  15 ते 20 जण जखमी झाले     हा अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात अनेकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला.

मृतांमध्ये दोन पुरुष, 6 महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची पोलिसांनी माहिती दिली. या अपघातानंतर एकच आक्रोश आणि किंकाळ्या सुरू झाल्या. प्रवाश्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने मदत केली. अपघातातील गंभीर जखमींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींवर शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दुःख व्यक्त मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आणि जखमींवर शासकीय खर्चाने   उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

 

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close