आमदाराच्या आश्रम शाळेत विध्यार्थ्यांचा मृत्यू

वर्धा जिल्हा कारंजा गाडगे तालुक्यातील नारा आश्रम शाळेतील विध्यार्थीचा मृत्यू झाला.. आश्रमशाळेत १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यूअमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील तो विद्यार्थी होता अशी माहिती समोर आली आहे. नारा येथील आदिवासी आश्रमशाळेत १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांसह पालक सुध्दा हादरले आहेत. गाद्यांच्या खाली मृतदेह आढल्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आहे. यामागे काहीतरी कटकारस्थान असल्याचा पोलिसांना संशय आहे. गादीखाली मृतदेह आढळला एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यामुळे सगळीकडं खळबळ माजली आहे.  मृतदेह गाद्याच्या खाली कोणी लपवून ठेवला होता, अशी देखील चर्चा आता सुरु झाली आहे. . या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी असा नाराजीचा सूर पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.. गदीखाली मृतदेह आढळला कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील स्व. यादवरावजी केचे नावाची आश्रम शाळा आहे. शिवम सनोज उईके असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील विद्यार्थी होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास शाळेतील विद्यार्थी झोपण्याकरिता गाद्या काढत असताना त्यांना गादीखाली मृतदेह आढळला आहे.त्यामुळे पालक वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close