बेलोना येथे बालमूर्ती बजरंगबली रथ यात्रेची जय्यत तयारी .

बेलोना येथे बाल मूर्ती बजरंगबली रथ यात्रेची जय्यत तयारी

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के

नरखेड तहसील येथील बेलोना तीर्थ क्षेत्र येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मार्गशीर्ष महिन्या मध्ये बुधवार दि 7 ताखेला पहाटे बंधिस्थ बजरंग बलीचे आगमन होत असून दुपारी रुद्राभिषेक पूजा पाठ कीर्तन भजन, सायंकाळी स्वयंभु बालमुर्ती बजरंगबलीची रथा मध्ये स्थापना,रात्रीला महाआरती होईल संपूर्ण दिंड्या हनुमान चालीसा मंडळ गावातील संपूर्ण भजन मंडळी वाजंत्री ढोल ताशा पथके राम झाकी यांच्या गजरात मिरवणूक निघेल दुसऱ्या दिवशी गुरुवार 8/12/2022 जीवना नदीच्या तीरावर विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात भाविक भक्तांच्या दर्शनासाठी जागेवर राहील .
शुक्रवार दि.9/12/2022 ला सकाळी रथांमधून बजरंगबलीची भव्य मिरवणूक ही गावातील संपूर्ण दींड्या , भजन मंडळ ,वारकरी भजन मंडळ , हनुमांचलीसा मंडळ,ब्यांड पार्टी, गावातील शिव गर्जना व पवणसुत ढोल ताशा पथक तसेच बाहेर गावावरून येणारे दिंद्या भजन मंडळी ब्यांड पार्टी, देव दढार याच्या गजरात निघणार असून तसेच देवी देवतांचे वेश भूषा परिधान केलेली दृश्य राम नामाच्या गजरात पाहायला मिळेल यावेळी संपूर्ण गावात महाप्रसाद ,चहा, कॉफी, दूध ,हलवा पुरी,पोहा , जेवण, भाविक भक्तांना गावकऱ्यांच्या वतीने प्रसाद वाटप केला जाईल . सायंकाळी 5वाजता बजरंगबलीचा रथ प्रभू श्री राम मंदिराजवळ आल्यास गोपाल काल्यास सूर्वात होईल तसेच दूर दुरून येणाऱ्या दींड्या भजन मंडळ ब्यांड पार्टी यांना मानपान देऊन सन्मान करण्यात येईल .रात्री 12ला पुन्हा रेशमी कापडात बजरंग बलीला बंधिस्त करून विठ्ठ्ल रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात ठेऊन यात्रेचा समारोप होईल या यात्रेला 260 वर्ष पूर्ण होत असून हनुमंताच्या दर्शनाला विदर्भ महाराष्ट्र मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनाला येत असतात यासाठी बजरांगबली मंदिराची रंग रंगोटि रुद्रांग चव्हाण यांच्याकडून तर राधा कृष्ण मंदिराची राजू लाखे तर राम मंदिर, शिव मंदिर, भवानी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर या सर्व मंदिराची जोरात ज्यांच्या अधिकारात मंदिर आहेत ते सर्व व्यक्ती रंग रंगोटी करत आहेत. तसेच बेलोना ग्रामपंचायत कडून बसस्टँड पाण्याची टंकी मेनरोड तसेच परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत आहे संपूर्ण गावातील गावकरी रथ यात्रेच्या तयारीला लागले असून संपूर्ण गावकऱ्यांनी या बांधिस्थ बजरंग बलीला अडीच दिवस दिसणाऱ्या श्री बजरंगबली च्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी येऊन बजरंगबली दर्शन रथ यात्रेचा व गोपाल कल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहेत.गावातील तरुण मित्र मंडळी नेहमी प्रमाणे बेलोना परिसर स्वच्छ सुंदर करण्यासाठी नियोजन करत आहेत .यावर्षी बेलोना नगरी ही संपूर्ण भगव्या पताक्या मधे पाहायला मिळेल

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close