
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी च्या विरोधात राज्यभरातून तीव्र पडसाद
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी च्या विरोधात राज्यभरातून तीव्र पडसाद
पिंपरी चिंचवड: छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वच स्तरातून राज्यपाल हटावच्या मागणीने आता जोर धरलेला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आझाद मैदानावर विराट मोर्चाची हाक दिली आहे. राज्यपाल हटवण्यासाठीच्या राजकीय हालचाली सुरू असतानाच पिंपरी चिंचवडमधील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. येत्या 8 तारखेला हा बंद पुकारण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात सुरू असलेला विरोध अजून ही संपताना दिसत नाही. आता पिंपरी चिंचवडमधल्या सर्व संघटनांनी एकत्र येत येत्या 8 तारखेला पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे.दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाही आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाने सात दिवस राज्यात आंदोलन करणार आहे
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज पहिलं आंदोलन मंत्री अतुल सावे यांच्या औरंगाबाद येथील घरासमोर केलं. मराठा क्रांती मोर्चाने ढोल वाजवत राज्यपाल हटावचा नारा दिला. काळी टोपी हाय हाय, राज्यपाल हटवलेच पाहिजे, अशा घोषणाही त्यांनी दिल्या.


