
बेलोना येथे शिवजयंती साजरी
मस्के प्रतिनिधी :बेलोना नगरीत शिव गर्जना ढोल ताशा पथक यांनी भव्य मिरवणूक काढून युवा तरुण मित्र मंडळीनी .लहान मुलांनी आनंदात केली शिव जयंती साजरी .बेलोना येथे शिव गर्जना ढोल ताशा पथक यांच्या मध्यामतून लहान मुला मुलींनी शिव जयंती मोठ्या थाटात साजरी केली . शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला लहान मुला मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बस स्ट्यांड वरून संपूर्ण गावामधे महाराजांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील युवा तरुण मित्र मंडळीनी प्रचंड प्रतिसाद दिला. तसेच गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात सुधा शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यामध्ये ग्रामगीता चार्य प्रा.ज्योती बनसोड यांनी महाराजांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व जीवन शैली वर प्रकाश टाकला. उपसरपंच लच्छु चंदेल गुलाबरवजी हेडाऊ पुरुषोत्तम थोटे हेमलता सातपुते ग्राम दक्षता समिती ढोल ताशा पथक यांनी उपस्थितीती दर्शवली . ब्यांक चौक तसेच पेठे विभाग येथे सुधा युवा तरुण मित्र मंडळीनी शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदात साजरी केली.शिव गर्जना ढोल ताशा पथक यांच्या मिरवणुकी मुळे संपूर्ण गाव भगवे दिसून आले .यात तरुण मित्र मंडळीनी तसेच लहान मुलां मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शिवाजी महाराजांची जयंती आनंदात साजरी केली.
