
प्रमख बातम्या, भाषण देतांना व्यासपीठ कोसळले, अजितदादा चा संताप, ईडी’चा घोटाळा बाहेर काढणार :संजय राऊत
राज ठाकरे भाषण देतांना व्यासपीठ कोसळले !
शिवजंयती निमित्य कार्यक्रमात एका व्यक्तीने मराठा विषयी प्रश्न केला असता अजितदादा पवार संतापले. आम्ही मराठ्यांचे पोटाचे नाहीं का? असे ते प्रति उत्तर व्यक्त केले.
शिवजयंती ला 25 वेळा रक्तदाता राजेंद्र टेकाडे
सामाजिक दायित्व करिता काम करणारे, रक्तदानाची जणजागृती करणारे राजेंद्र रामहरी टेकाडे यांनी 40 वेळा रक्तदान केले. त्यात 25 वेळा शिवजंयती ला रक्तदान केले.
# रक्तदानाची जनजागृती करणारा शिक्षक राजेंद्र टेकाडे
# देहदनाचा केला संकल्प
काटोल – शिक्षकांना सामाजिक अभियंता म्हटले जाते.समाजात नवचेतना प्रदान करण्यासाठी काही शिक्षक विविध उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पार पाडीत असते. असाच एक अवलिया शिक्षक ‘रक्तदान चळवळ’ सक्षम करण्यासाठी स्वकृतीतून समाज संदेश देत आहे.जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, काटोल येथील केंद्र समन्वयक राजेंद्र रामहरी टेकाडे रक्तदान करण्याविषयी मागील १७ वर्षांपासून जनजागृती करीत आहे.स्वतः आज शिवजयंतीला आयुष्यातील ४० वे रक्तदान केले असून त्यातील २५ वेळा रक्तदान शिवजयंतीला केलेले आहे.सेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ‘देहदान संकल्प’ केलेला आहे.कारण मृत्यूनंतर देह मातीत पुरला जातो किंवा जाळला जातो.मात्र वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देह मिळाल्यास त्याचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी होतो असे त्यांचे मत आहे.काटोल परिसरात शालेय उपक्रमात तसेच सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग असतोच मात्र रक्तदानाविषयी असणारा गैरसमज व अंधश्रद्धा समाजातून नष्ट करण्याकरिता ते प्रयास करीत असतात.तसेच गरजूंना रक्त मिळण्याकरिता शेर शिवाजी युवा संघटनेचे संस्थापक सागर राऊत यांच्या माध्यमातून सहकार्य करीत असतात.आयुष्यात ५० वेळा रक्तदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे.त्यांनी केलेल्या रक्तदानातून बऱ्याच रुग्णाचे प्राण वाचलेले आहे.खऱ्या अर्थाने सामाजिक शिक्षण स्वतःच्या कृतीतून देण्याचा प्रयत्न करीत आहे.
रक्तदान केल्यामुळे नवीन रक्त येते आणि आरोग्य सुदृढ राहते.गरजू व्यक्तींना रक्ताचा उपयोग होत असल्यामुळे मानसिक समाधान मिळते.तेव्हा सक्षम व्यक्तीने रक्तदान करणे काळाची आवश्यकता आहे.
– राजेंद्र रामहरी टेकाडे
काटोल जि.नागपूर
केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोरमुंबई : ‘केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर केले आहे. ती तुमची साधने झाली आहेत. हे क्रिमिनल सिंडिकेट आहे. ते उघड केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कुणाला अंगावर यायचे असेल तर या. तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. तुम्हाला तोंड काळे करून जावे लागेल. आता बंद करा हे धंदे,’ असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी भाजपला दिला.येत्या आठवड्यात ‘ईडी’चा सर्वात मोठा घोटाळा मी बाहेर काढणार आहे, असेही ते म्हणाले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊत म्हणाले, ‘तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचे ते लावा. माझे स्पष्ट आव्हान आहे. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही अशा कितीही धमक्या दिल्या तरी ‘रिश्ते में हम आप के बाप लगते है.’सोमय्या यांचा पालघरला येऊर गावात मोठा प्रकल्प सुरू आहे. २६० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा या प्रकल्पाच्या संचालिका आहेत. या २६० कोटींच्या प्रकल्पात ईडीच्या संचालकांचे किती पैसे आहेत, असा प्रश्न राऊत यांनी या वेळी केला.



