ग्रामपंचायत गोंडीदिग्रस येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ग्रामपंचायत गोंडीदिग्रस येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजराग्रामपंचायत गोंडीदिग्रस येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पाणवाडी प्रतिनिधी : ग्रामपंचायत गोंडीदिग्रस अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सक्रिय सहभाग नोंदविण्यात येत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावर्षी ध्वजारोहणाचा मान आयुष दिलीप महंत यांना देण्यात आला. यानिमित्ताने ग्रामपंचायत गोंडीदिग्रस मार्फत दिव्यांग बांधवांच्या सन्मानार्थ विशेष उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच श्रीमती मंदा सुरेंद्र महंत, उपसरपंच दिनेश पंजाब तरारे, सदस्य गौतमजी डबरासे, ग्रामपंचायत सदस्या ममता महंत, वर्षा मेंडके, उमाताई निस्वादे, निकिता तरारे, iसन्माननीय नागरिक फुलदासजी महंत, ग्रामपंचायत अधिकारी सुनीता पाटील, तसेच एकल महिला प्रतिनिधी ममता ताई लोलुसरे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच स्वच्छ सुंदर आंगण स्पर्धा 2026 ची विजेती आशा सुमरन डबरासे यांना देखील शाल, शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमस्थळी गावातील प्रतिष्ठित नागरिक अमितजी राऊत, मोहनजी तरारे, नूतनजी डबरासे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, बचत गट प्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close