
फेटरी (नागपूर–कळमेश्वर मार्ग) | एका स्वप्नाचा अंत
फेटरी (नागपूर–कळमेश्वर मार्ग) | एका स्वप्नाचा अंत
नागपूर–कळमेश्वर मार्गावरील फेटरी गावात असलेल्या OYO Rahul Services Apartment येथे घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे 2.30 वाजता सौरभ जामगडे (वय २५) आणि त्याची प्रेयसी रुचिका भांगे (वय २१) यांनी हॉटेलमध्ये खोली घेतली होती.
शुक्रवारी सकाळी साफसफाईसाठी दरवाजा ठोठावण्यात आला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडल्यानंतर बेडवर रुचिका भांगे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाली.
सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात दोघे गुरुवारी दुपारी हॉटेलमध्ये आलेले दिसतात. मात्र सुमारे 3.30 वाजता सौरभ जामगडे हॉटेलच्या मागील बाजूने भिंत ओलांडून निघून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तेव्हापासून तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
रुचिका ही पदवीधर होती. ती बोरगाव येथील नातेवाईकांकडे राहत असून पोलीस भरतीची तयारी करत होती. दोघेही लग्न करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात मोबाईल परत मिळवण्याच्या कारणावरून भेट ठरल्याचे समोर येत असून, घटनेचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
एक तरुण आयुष्य… एक स्वप्न… एका क्षणात संपले.
हे प्रकरण केवळ एक बातमी नसून समाजासाठी गंभीर इशारा आहे.
कोणताही वाद, कोणतीही अडचण — हिंसा हा कधीच उपाय नसतो.
