अमली पदार्थ सेवन करणाऱ्या चार जणांना अटक

गळपुरा चौकात अमली पदार्थ सेवन करतांना चार जण अटकेत

काटोल शहरातअमली पदार्थ सेवन करण्याच्या आरोपा खाली चार जणांना काटोल पोलीसानी अटक केली. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी अंतर्गत पोलिसांनी कारवाई करत गळपुरा चौक येथे 13 जुलै रोजी अमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात पकडले.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमध्ये रमेश बाबूलाल शिपादे 68 राहणार पवनसुतपुरा नागपूर गुलाब दीपक चव्हाण 55 राहणार अन्नपूर्णा नगर काटोल,नसीर रशीद शेख पेठ बुधवार काटोल, हसन दिलावर शहा 70 राहणार पेठ बुधवार काटोल यांचा समावेश आहे यांच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या नेतृत्वात पीएसआय गोगले, पोलीस कर्मचारी प्रमोद ठाकरे यांच्या पथकाने केली आहे त्या कारवाईला शहरात अमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती झाली असून पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या अशा प्रकारच्या आणखी कठोर कारवाया करण्यात इशारा दिला आहे. कमी पैशात नशा मिळत असल्यामुळे शहरा बाहेरच्या टपऱ्यांवर जमत असलेले तरुण मंडळी सातत्याने या पदार्थाची सेवा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 काटोल पोलीस स्टेशन मधील कर्मचारी स्थानिक असल्याने शहरातील परिस्थितीचे त्यांना पूर्ण कल्पना आहे. शाळेकरी मुले व्यसनाच्या आहारी जात आहे परंतु यासाठी अमली पदार्थ कोण आणि कुठून येतात याची माहिती असून ही कारवायाची भाषा होत नाही ही बाब चिंताजनक आहे

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close