शिक्षक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

काटोल प्रतिनिधी – शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था मर्यादित, काटोल यांच्या वतीने दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध शैक्षणिक संस्थांमधून सेवानिवृत्त झालेल्या आदरणीय शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक सहकारी बँकेचे संचालक डॉ. रवींद्र युनुरकर यांनी भूषवले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षकांचे समाजातील योगदान आणि त्यांच्या अमूल्य सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांनी घडवलेली पिढी घडवण्याची भूमिका समाजासाठी अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हेमराज चरडे, उपाध्यक्ष हेमराज सावरकर, केंद्र प्रमुख चंद्रहासजी वढोणे, व्यवस्थापक प्रशांत मानकर, पत्रकार ज्ञानेश्वर बालपांडे, तसेच संस्थेचे कर्मचारी, अभिकर्ते, सभासद आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.सेवानिवृत्त शिक्षकांनी या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानून संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी आपल्या अनुभवातून काही महत्त्वाचे विचार उपस्थितांपुढे मांडले आणि नव्या पिढीसाठी मार्गदर्शनही केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतना नेवारे मॅडम यांनी केले. त्यांनी शिक्षक दिनाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे औचित्य सांगून उपस्थितांचे स्वागत केले. आभारप्रदर्शन संस्थेचे सचिव विनायक कडधाम सर यांनी केले.कार्यक्रम अतिशय उत्साहात, स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजात शिक्षकांचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close