
मौद्यात काँग्रेस भाजप ची अभद्र युती
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव.
केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात मौद्यात खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये युती झाली. भाजपाचे माजी आमदार टेकचंद सावरकर आणि
काँग्रेसचे नेते सुनील केदार गटाने युती केली.या युतीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाला.. एकाकी पडलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजरात यांचा पॅनलचा पराभव झाला असून भाजप आणि काँग्रेस युतीचा विजय झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. या युतीमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आता अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी थेट अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादीचा पराभवाची थेट चर्चा मुंबईपर्यंत सुरू आहे.
Live Cricket
Live Share Market
