
बेलोना जिल्हापरिषद च्या शाळेत आनंद मेळावा
बेलोना जिल्हापरिषद येथील मुलांच्या शाळे मध्ये आनंद मेळावा

विदर्भ दर्पण news- स्पर्धेच्या युगात शिक्षण वाघीण दूध असते, या म्हणीला जिल्हा परिषद शाळेचे विध्यार्थीच साकार करू शकतात,नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका मध्ये बेलोना येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता .या आनंद मेळाव्यात विविध विद्यार्थ्यांनी खाण्याचे विविध व्यंजन करून स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल वर व्यंजनाची खरेदी शिक्षक वर्ग आणि
ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी केली.यामुळे शाळेतील मुला- मुलींचा आनंद दुगुणित झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थी यांच्या सुप्तगुणांना चालना देण्या सारखे होईल, येणाऱ्या दिवसात ही सर्व कार्य व्यवसाय करीता महत्व पूर्ण ठरेल, अशा प्रकार चे उपक्रम जिल्हा परिषद च्या राबविण्यात आले तर विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल आणि आपला स्वतंत्र व्यवसाय विधार्थी थाटू शकतात. या मेळाव्या मध्ये मुला मुलींनी विविध खाद्य पदार्थ घरून बनवून आणले होते फ्रुड्स आणले होते. मुलान कडून आणलेल्या साहित्य खाऊ यांचा शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील सरपंच,मेम्बर्स व जनतेनी या आनंद मेळाव्यामधील विद्यार्थी विद्यार्थिनीआणलेल्या खादयपदार्थाची प्रचंड खरेदी करून विद्यार्थी यांचा प्रचंड उत्साह वाढवला.
तरुण मित्र मंडळींनी व गावाकऱ्याणी हा आनंद मेळावा असा नेहमी शाळेमध्ये करत राहा यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले.
