
विहीरीत मृतदेह सापडलासांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना
सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा मृतदेह म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सापडला आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील एका तरुणाचा खून झाला आहे. तो तरुण व्हॉट्सॲपवरतीअसं काही पाठवायचा की लोकांना टेन्शन यायचं. त्याचा राग मनात धरुन पाच तरुणांनी एका तरुणाला संपवलं आहे. त्या तरुणाचा मृतदेह म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सापडला आहे. पाच मित्रांनी मिळून खून केला आहे. पोलिसांनीया प्रकरणातील पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांची चौकशी देखील पोलिस करीत आहेत. ज्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे, त्याचे नाव सुशिल सुर्यकांत आठवले असं आहे.व्हॉट्सॲपवरती अश्लील मेसेज पाठवित असल्याचा राग मनात धरून सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरातील सुशिल सुर्यकांत आठवले या २३ वर्षीय तरुणाचे अपहरण करुन पाच जणांनी खून करून म्हैसाळच्या कालव्यात टाकला होता. मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकांनी शोधून काढला. सातव्या दिवशी लंगरपेठ गावच्या हद्दीत म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सदरचा मृतदेह सापडला. या खुनप्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे.Live Cricket
Live Share Market



