
वनपरीक्षेत्र अधिकारी सह दोघांन वर लाच प्रकरणनी कारवाई एकाला 83000 रुपये स्वीकारतांना अटक
वनपरीक्षेत्र अधिकारी सह दोघांन वर लाच प्रकरणनी कारवाई एकाला 83000 रुपये स्वीकारतांना
अटक
वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली जिल्हा गडचिरोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ममता राठोड व मारुती गायकवाड आणि गणेश राठोड यांच्या वर लाच प्रकरणी अहेरी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किस्टापूर येथील गृहस्थानी घरकुल करीता वनविभागाच्या हद्दीतील नाल्यातून माती उत्खनन केली. उत्खलन करताना ट्रॅक्टर आणि मजूर यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय आलापल्ली जिल्हा गडचिरोली ममता राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी व मारुती संभाजी गायकवाड वनपाल तांबोडी आणि गणेश राठोड वनरक्षक फिरते वन संरक्षण पथक यांनी लाचेची मागणी केली. मिळालेल्या तक्रारी वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई करण्यात आली. तक्रारदार व त्यांचे मजूर घरकुलाकरिता ट्रॅक्टर मध्ये गावाजवळच्या नाल्यातून अवैध रित्या माती भरत असताना वनपाल मारुती गायकवाड यांनी फॉरेस्टच्या जागेतून माती उत्खनन का करीत आहे.अशी तंबी देत एक लाख दहा हजार रुपयाची मागणी केली.याबाबत सात फरवरी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली कॅम्प किस्टापूर येथे तक्रार दिली होती. तसेच राठोड यांनी तक्रारदार यांना परस्पर बाहेर भेटून सदर प्रकरण मिटवून देण्याकरिता 35000 रुपयाची मागणी केली होती. आरोपी गायकवाड यांनी पण एक लाख दहा हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती.तरजोडी नंतर एक लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली असता वन परिक्षेत्र अधिकारी ममता राठोड यांच्या कक्षात येणारे वनपाल मारुती संभाजी गायकवाड याने 17000 रुपयाची दंडाची पावती फाडून उध्वरीत 83 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.लाचेची रक्कम घेऊन आरोपी गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले. ममता राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश वन संरक्षण पथक यांना पोलीस यांचा शोध घेत आहे
ही कारवाई डॉक्टर दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र नागपूर, सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक, सचिन संजय पुरंदरे, तर सापळा व तपास अधिकारी चंद्रशेखर ढोले उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी कारवाई केली असून पुढील तपास सुरु आहे.
