पत्नी आणि मुलाचा खून करुन अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या

   पुणे =  पुण्यातील औंध परिसरात एका बिल्डिंग मध्ये 3 जणांचे मृतदेह आढळून आले आहे. पत्नी आणि मुलाचा खून करुन संगणक अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंध परिसरात घडली. सुदीप्तो गांगुली (वय 44, रा. डीपी रस्ता, ओैंध) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. सुदीप्तोने पत्नी आणि मुलाचा खून करुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. सुदीप्तोचा ‌भाऊ बंगळुरूमधील एका माहिती-तंत्रत्रान कंपनीत कामाला आहे.औंध भागात राहणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये नवरा बायको आणि मुलगा असे 3 मृतदेह मिळाले आहेत. आयटी अभियंता असलेल्या तरुणाने बायको आणि 9 वर्षीय मुलाला पॉलिथीन बॅगने तोंड दाबून त्यांची हत्या केली आणि त्यांनर स्वतः गळफास घेतला. हा तरुण पश्चिम बंगालचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो पुण्यात एका आय टी कंपनीमध्ये काम करत होता. नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली याचा तपास सुरू आहे. प्रियांका सुदीपतो गांगुली (वय. 40), मुलगा तनिष्क गांगुली (वय. 08) आणि पती सुदिप्तो गांगुली (वय. 44) अशी तिघांची नावे आहेत.. मंगळवारी रात्री चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. सुदिपचा भाऊ हा बेंगलोरला असतो. त्याने त्याच्या मित्राकरवी काल हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close