छत्रपती संभाजीनगरमध्ये गावाकडे जाण्यासाठी ट्रॅक्टर चोरला होता.

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगर  शहरातील चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या राजेंद्र बारबिंडे नावाच्या एका व्यक्तीने जालन्यात गावाकडे जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळा मागील भिंतीलगत लावलेले रामनाथ राठोड यांचे ट्रॅक्टर चक्क ट्रॉलीसह चोरले. ट्रॅक्टर चोरी  झाल्याची तक्रार मालकांनी तात्काळ पोलिसांच्या कानावर घातली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सगळीकडे चौकशी सुरु केली. पोलिसांनी ट्रॅक्टर कोणत्या दिशेला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला २४ तासात ताब्यात घेतले. त्या चालकाकडे असणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपीला पोलिसांनी  ताब्यात घेतले असून त्याचा सध्या चौकशी सुरु आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close