
‘पति-पत्नी आणि वो’ चा हा विषय आहे.आयुष्यातील सर्वात मोठा झटका दिला.
दोघांच लग्न कधी झालेलं?दोघे पळून दिल्लीला गेल्याच टिंकूला समजलं. त्यांनी तिथे जाऊन एका मंदिरात लग्न केलं. त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून टिंकूपर्यंत पोहोचवले. पती टिंकू यादव आता पोलिसांकडे न्याय मागत आहे. तिच्या शिक्षणावर इतका खर्च केला, ते पैसे परत मागत आहे. वर्ष 2020 मध्ये टिंकू कुमार यादवच प्रिया कुमारी बरोबर लग्न झालं होतं. लग्नानंतर प्रिया कुमारीने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. टिंकू यादवने तिला नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. यासाठी त्याने पदरचे 2.50 लाख रुपये खर्च केले. टिंकू यादवने यासाठी कर्ज काढलं व शकुंतला नर्सिंग कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळवून दिला. पत्नीच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून टिंकूने शहरातील वसतिगृहात तिच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली. प्रिया कुमारी फायनल इयरला होती. पण या दरम्यान ती प्रेमात आकंठ बुडाली होती. प्रियकर दिलखुश राऊतसोबत ती पळून गेली व लग्न केलं.



