
डोळंबा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दिला सर्व धर्म समभावाचा संदेश
डोळंबा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दिला सर्व धर्म समभावाचा संदेश
अनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
१५ऑक्टोंबर रोजी तालुक्यासह गावागावात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४८वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देशात अनेक भागात
सामाजिक धार्मिक वातावरण गढूळ करणाऱ्या घटना घडत असताना दिग्रस तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या डोळंबा गावात सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला. सर्वप्रथम गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सुरज आडे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थित्यांना मार्गदर्शन केले सुजल जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्या नंतर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसह संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता तरुणांनी डीजेच्या तालावर सेवालाल महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय भीम असणारे झेंडे थीरकावत समानतेचा संदेश दिला डॉ. बाबासाहेब विचार मंच व संभाजी ब्रिगेड मंडळाकडून थंड पाणी व नाश्त्यासह सरबताची व्यवस्था करण्यात आली होती.या जयंती महोत्सवासाठी गावातील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.



