
बेलोना येथील अरविंद बांबल च्या दोषीवर कारवाई होणार का?
बेलोना येथील अरविंद बांबल च्या दोषीवर कारवाई होणार का?
पानवाडी प्रतिनिधी : नागपूर जिल्ह्यातील बेलोना गाव बालमूर्ती हनुमंत चे श्रद्धांस्थान आहे. या गावाचा विकास करणे ग्रामपंचायत ची प्राथमिकता आहे परंतु बेलोना गावाचा विकास झालेला नाही. गावातील अनेक अडचणी दूर न करता गावात पाहिजे त्या प्रमाणात सुविधा नाही.राजकर्ते सत्तेचा उपभोग घेऊन मोकळे होतात.परंतु गावाचा विकास होतांना दिसत नाही. गावालगत असलेल्या नाल्याचा खोलीकरण करिता निधी उपलब्ध झालेला होता त्या निधीत
गैरव्यवहार केला गेला. म्हणून अरविंद बांबल यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे निधीत गैव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी घेऊन सुडाच्या भावनेतून बांबल यांचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. शेवटी अतिक्रमनाची कारवाई साठी फौज फाट्यासह ग्रामपंचायत प्रशासनानी तयारी करून बांबल यांच्या घरावर अतिक्रमणासाठी गेले असता अरुण बांबल यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना वीजवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु बांबल 70% जळाल्याने पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे घेऊन गेले. परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अरविंद बांबल यांचा मृत्यू झाल्याची बातमी बेलोनावाशी यांना कळताच गावात आक्रोश निर्माण झाला. मृतदेह बेलोना येथे आल्यानंतर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत ला दोषी ठरवित आपला मोर्चा ग्रामपंचायतकडे कार्यालय कडे वळवला याची माहिती पोलिसांना पूर्वीच होती त्यामुळे पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालय समोर बंदोबस्त लावला होता.पोलीस निरीक्षक हरीश तिवारी यांनी आक्रोशकारी जनतेला समजवून प्रकरण शांत केले.परंतु नागरिकांनी अरविंद बांबल यांच्या दोषीवर कारवाईची मागणी केली असता या मागणीची दखल घेतल्या जाईल आणि दोषी वर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर प्रकरण शांत होऊन.अंत्यसंस्कार हजारो नागरिकांच्या उपस्थित मध्ये बेलोना येथे पार पडले.?
