विविध आकारांच्या राख्या बनवुन विद्यार्थ्यानी घेतला आनंद.

दिग्रस प्रतिनिधी: डहणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत रक्षांबधन सणाचे औचित्य साधुन विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी राखी बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये मोठ्या उत्साहाने विद्यार्थी सहभागी झाले होते. टाकाऊ पदार्थोंपासुन राखी कशी तयार करावी या विषयाचे मार्गदर्शन इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले.वेगवेगळय़ा रंगाची कागद ,मनी,लेकर,धागे व लेस यापासुन अतिशाय सहजरीत्या‌ वेगवेगळय़ा आकारांच्या राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण‌ विद्यार्थ्याना देण्यात आले यामध्ये विविध आकारांच्या राख्या बनवुन विद्यार्थ्याना स्व निर्मितीचा आनंद घेतला विद्यार्थ्यानी टाकाऊ व विविध प्रकारचे साहित्य वापरुन आकर्षक राख्या तयार केल्या. तसेच प्रदर्शनी हरवुन आकर्षक राख्या तयार करणाऱ्या विद्यार्थ्याना बक्षीत देऊन गौरव करण्यात आला. या सोबतच शाळेत रक्षांबधनाचा सोहळा आयोजित करण्या आला होता.यावेळी मुलींनी मुलांचे औक्षण करून राख्या बांधल्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजु ढोके,सहाय्यक शिक्षक शरद चौधरी,राजेश्वर वानखेड़े, एकनाथ तायडे,राजुसिंग राठोड,सुषमा दुधे,मंगला देवतळे,शिल्पा कळंभे,शितल मेश्रान आदी उपस्थित होते .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close