
लाखोंचे कपडेही लंपास दुकानाचं शटर उचकटून जबरी चोरी
कल्याण शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे
कल्याण | कल्याण शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कपड्याच्या दुकानात शटरचे लॉक तोडून लाखोंचे कपडे लुटून चोरट्यांनी पोबारा केला. महत्वाचे म्हणजे भररस्त्याला लागून असलेल्या या दुकानात चोरी करताना तब्बल अर्धा तास शटर उघडं ठेवून ही चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांची गस्त असूनही त्यांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी डाव साधल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केल्याचेही त्यात दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे चोरट्यांनी लाखोंचा माल पळवल्यानंतर पीडित दुकानदार पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र पोलिसांनी तेवढी संपूर्ण रक्कम न लिहीता कमी किंमत लिहीण्यासाठी दुकानदारावर दबाव टाकत अवघ्या 66 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Live Cricket
Live Share Market



