काठी येथे शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

काठी येथे शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

अनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी दिग्रस तालुक्यातील काठी या गावातील एका शेतकऱ्याने सततची नापिकि व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज 10ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजताचे दरम्यान घडली. मृतक शेतकऱ्यांचे नाव गुलाब बालीकराम ताथोड वय 63 वर्षे आहे. शासनाचे शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे दिग्रस तालुक्यातही दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यात वाढ होत असून गुलाब ताथोड या शेतकऱ्याकडे अडीच एक्कर शेती असून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दिग्रस चे दीड लाख रुपये पीक कर्ज थकीत असून सततची नापिकी, व कर्जबाजारीपनाला कंटाळून व चालू वर्षी अतिवृष्टी व कापूस पिकावर बोन्ड अळीने केलेले आक्रमन या विवणंचनेत कर्ज कसे फेडावे अशातच त्यांनी आज विष प्राशन केले. हि घटना कळताच त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय दिग्रस,व प्रकृती चिंताजनक असल्यामुळे यवतमाळ येथे हलविण्यात आले मात्र मधातच त्यांची प्राणजोत मावळली . त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांचे मनमिळाऊ स्वभावाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close