पतंजली योग समन्वय समितीने केला जागतिक महिला दीन साजरा.

 

बेलोना प्रतिनिधी

हसून प्रत्येक वेदना विसरणारी.
नात्यामध्ये तिची बंधिस्थ दुनिया सारी.
प्रत्येक वाट प्रकाश मान करणारी.
ती शक्ती आहेत एकच नारी.ऐक नारी तीन कुळाचा उद्धार करी

नरखेड येथील महावीर लॉन मधे पतंजली योग समन्वय समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम थोटे यांच्या अध्यक्षते खाली सकाळी 6 ते 7 या वेळेस प्रमुख उपस्थितीत योगा च्यारि नरहरि बांदरे , किशोरी कहाते महिला समिती प्रभारी , रजनी थोटे शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार दीप प्रज्वलन करून तसेच योग प्राणायाम यांनी सुरुवात झाली आंतरराष्ट्रीय महिला दिनावर महिलांना समाजातील रुढी प्रथा परंपरा आणि समाजाचा त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपल्या शरीराला योग प्राणायाम किती महत्वाचा आवश्यक आहेत विज्ञान व आध्यात्म याना जोडणारा ब्रीज म्हणजे शिक्षण तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चारित्र्यावर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मालधुरे पतंजली मीडिया प्रभारी तसेच आभार सहप्रभारी चंद्रशेखर मस्के यांनी केले . अजीता पाटोले ,अर्चना डवरे,संगीता कहाते ,बबली वेरुळकर, सारिका डहानकर,आरती डहानकर,उमा वेरुळकर, जया बलापांडे तसेच यांच्या सहकार्याने असंख्य महिलांच्या उपस्थितीत आंतर राष्ट्रीय महिला दीन साजरा करण्यात आला. तसेच प्रसाद वितरित करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात     आला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close