आधी काकूवर चाकूने केला वार, नंतर भावालाही इजा,तासाभरात अटक

मीरा-भाईंदर | 1 नोव्हेंबर 2023 : सध्या मुंबईत गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. अशीच एक घटना मीरा-भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. तेथे एका तरूणाने घरात घुसून त्याच्या काकूची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास मीरा-भाईंदरमधील क्वीन्स पार्क एरिआमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तासाभराच्या आतच अटक केली. जिशान खाने असे आरोपीचे नाव असून तो अवघा २० वर्षांचा आहे.” या हल्ल्याची आणि हत्येची माहिती मिळताच, आम्ही तातडीने विशेष पथके तयार केली आणि शोध घेऊन एका तासात भाईंदर (पश्चिम) येथून आरोपीला पकडले,” असे पोलिसांनी सांगितले. अवघ्या २० वर्षांच्या या तरूणाने हे कृत्य नेमकं का केलं, काकूलर आणि त्यानंतर तिच्या मुलावरही वार का केले, या गुन्ह्यामागचा नेमका हेतू अद्याप समजू शकलेला नाही. मात्र पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी नमूद केलं.हल्लेखोर जिशान याचे कुटुंबीय आणि हल्ल्यात मृत झालेल्या शबाना यांचे, कुटुंबिय, दोघेही मूळ मध्य प्रदेशातील असून काही वर्षांपासून ते मीरा रोड येथील क्वीन्स पार्क परिसरात रहात होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध नवघर पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यामागचा नेमका हेतू काय होता आणि आरोपीला कोणी मदत केली होती का, याचा तपास पथकाकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र या हल्ल्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही. दरम्यान या घटनेने आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close