चोरी करून पळाला; चार महिन्यांनी कसा सापडला ?

मुंबई |दोन तुटलेल्या दातांमुळे मुंबईत एका चोराला चोरीच्या घटनेच्या चार महिन्यांनंतर पकडण्यात आले. बोरिवली येथे ‘स्पायडर मॅन’ म्हणून ओळखला जाणारा अज्ञात चोरटा चोरी करून पळून जात असताना दुसऱ्या मजल्यावरून पडला. यामुळे त्याचे दोन दात तुटले आणि पायही फ्रॅक्चर झाला. विशेष म्हणजे त्याच दोन तुटलेल्या दातांच्या मदतीने पोलिसांनी चार महिन्यांनी त्याला अटक केली. रोहित राठोड असे २९ वर्षीय चोरट्याचे नाव आहे.

22 जून रोजी आरोपी रोहित हा राजाराम तावडे रोडवर असलेल्या अर्पिता या अपार्टमेंटमध्ये चोरी करण्यासाठी पोहोचला होता. येथे दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये त्याने चोरी केली. मात्र घरातील एका माणसाने त्याला चोरी करताना पाहिल्यावर इतरांना हाक मारली. पण तोपर्यंत रोहितने किचनच्या खिडकीतून उडी मारून पळ काढला. त्यात तो जखमी झाला पण तसाच पुढे पळाला. नंतर पोलिसांना चोरीची माहिती देण्यात आली.चोराला बराच मार लागल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात जाईल याचीही पोलिसांना खात्री होती. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली, पण चोर काही सापडला नाही. यानंतर दररोज वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करण्यासाठी एका पोलिसाची ड्युटी लावण्यात आली होती. गेल्या आठवड्यात वाकोल्यातील एका रुग्णालयात चोरट्यावर उपचार सुरू असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने पाहिले. यानंतर पोलिसांनी त्याला डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहिली. हॉस्पिटलमधून चोर घरी पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close