थेट लोखंडी रॉडच…. मालकिणीलाही केली मारहाण कुत्रा भुंकल्यावर तो भडकला,

कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला

भयानक ! कुत्रा भुंकल्यावर तो भडकला, थेट लोखंडी रॉडच.... मालकिणीलाही केली मारहाणभुवनेश्वर |हे संपूर्ण प्रकरण ओडिशातील भुवनेश्वरमधील कॅपिटल पोलिस स्टेशनचे आहे. रिपोर्टनुसार, चंदन नायक असे आरोपीचे नाव असून त्याने पाळीव कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या संपूर्ण घटनेसंदर्भात महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. रिपोर्टमध्ये महिलेने आरोपी चंदनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत, तर आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणीही तिने केली आहे.महिलेने पोलिसांना सांगितल्यानुसार, दुपारच्या सुमारास आरोपी चंदन आणि त्याचे वडील तिच्या घरासमोर आले आणि आरडाओरडा करू लागले. महिलेने दरवाजा उघडताच दोघांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिचा कुत्रा जोरात भुंकत असल्याने त्रास होतोय, त्याला शांत कर असे आरोपीने तिला सांगितले. मात्र त्याच्या उद्धट, अरेरावी गाजवणाऱ्या टोनमुळे महिलेने कुत्र्याला शांत करण्यास नकार दिला. तेव्हा चंदनने तिचे केस पकडून तिला जोरात रस्त्यावर ओढलं आणि तिचे कपडेही फाडले. यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला आणि अत्याचाराचाही प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेत आरोपीच्या वडिलांनी त्याला पुरेपूर साथ दिलीएवढेच नव्हे तर आरोपीने तिच्या कुत्र्यावर टोकदार रॉडने हल्ला केला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तो रॉड घुसवल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणी महिलेने गंभीर आरोप केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close