आत हिंदू मुलीसोबत अश्लील कृत्य,शौचालयात कपल एंट्रीचे 200 रुपये,
October 19, 2023
72 Less than a minute
इंदोर : लव्ह जिहादच एक वेगळच प्रकरण समोर आलय. एक युवक आपली ओळख लपवून हिंदू मुलींसोबत मैत्री करायचा. त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचा. मुलीचा विश्वास जिंकल्यानंतर तो त्यांना सुलभ शौचालयात नेऊन तिथे अश्लील कृत्य करायचा. आरोपी शौचालयतील कर्मचाऱ्यांना 200 रुपये एंट्री फी सुद्धा द्यायचा. आरोपीने बुधवारी सुद्धा आला होता. याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यावरुन मोठा हंगामा झाला. या दरम्यान आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदोरमध्ये ही घटना घडली. बजरंग दलाने माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलीची चौकशी केली. काऊंसिलिंगची प्रोसेस सुरु केली. इंदोरच्या परदेसीपुरा ठाणा क्षेत्रातील हे प्रकरण आहे. आरोपीने जनता क्वार्टर जवळ असलेल्या सुलभ शौचालयात हे कृत्य केलं.शौचलायतील कर्मचाऱ्यांची आरोपी साहिलसोबत मैत्री होती, असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. साहिल या भागात हिंदू नाव धारण करुन फिरायचा. हिंदू मुलींशी ओळख करुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण करायचा. आरोपी साहिल नेहमीच कुठल्या ना कुठल्या मुलीला फसवून इथे घेऊन यायचा. सुलभ शौचालयाच्या कर्मचाऱ्यांना तो 200 रुपये द्यायचा. त्या बदल्यात ते शौचालयातील जागा द्यायचे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी रात्री माहिती मिळाली की, साहिल एका मुलीला घेऊन शौचालयात आलाय. त्यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी विकलांग टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडला नाही.