जावयासह मुलीला घरी बोलावलं, त्यानंतर जे घडलं ते वाचून उडेल थरकाप.

मुंबई |  :  गोवंडी येथे राहणाऱ्या तरूणीने प्रेमविवाह  केला. मात्र तो तिच्या घरच्यांना पसंत नव्हता. त्यानंतर त्यांनी असं काही केलं ज्यामुळे संपूर्ण शहर हादरलं. एका इसमाने त्याच्या पोटच्या मुलीची आणि जावयाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलीसांनी दुहेरी हत्या प्रकरणाची उकल केली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, तिचा भाऊ, त्याचा मित्र या तिघांना अटक केली. त्याशिवाय तीन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी गुलनाजला तिच्या वडिलांचा, गोरा खान ( वय ५० ) यांचा फोन आला आणि त्यांनी तिला व जावयला घरी येण्याचा आमंत्रण दिले. वजीलांचा फोन आल्यामुळे ती खुश झाली. आपला राग गिळून वडिलांनी बोलावलं, याचा अर्थ आता ते नाराज नाहीत, असं तिला वाटलं. आनंदाच्या भरात ती पती करणसोबत गावाहून निघाली खरी पण… त्यानंतर ती कुणालाच पुन्हा दिसली नाही.गुलनाज आणि करण घरी आल्यानंतर तिचे वडील गोरा, तिचा भाऊ सलमान खान (२२) आणि त्याचा मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांनी त्यांची हत्या केली. त्यांनी करण व गुलनाज दोघांच्याही गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांचा जीव घेतला. मात्र आपल्यावर कोणालाही संशय येऊ नये म्हणून जावई करण याचा  मृतदेह मानखुर्द भागातील एका विहीरीत फेकून दिला. तर मुलगी गुलनाज हिचा मृतदेह खारघर येथे फेकला.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close