मुलीच्या उपचारांसाठी रक्त आणू म्हणाला आणि पैसे घेऊन थेट…

गोंदिया | आजारी असलेल्या मुलीच्या उपचारांसाठी रक्त आणून देत तिच्या आईकडून भामट्याने 25 हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी कारवाई करत त्या भामट्याला बेड्या ठोकत अटक केली.हिवराज महादेव सूर्यवंशी (52) असे आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या रुग्णालयात ही घटना घडली. तेथे एक महिला तिच्या आजारी मुलीला उपचारांसाठी घेऊन आली होती. तिची तब्येत बरी नसल्याने ती माऊली आधीच चिंतेत होती. आरोपीने हे हेरलं आणि त्याने त्या महिलेशी ओळख काढून बोलायला सुरूवात केली. त्या महिलेच्या मुलीला रक्ताची गरज असल्याचे ते समजलं. आपण ते रक्त आणून देऊ शकतो, असं गप्पा मारता मारता त्याने सांगितलं.त्यासाठी आरोपीने पीडित महिलेकडून 25 हजार रुपये घेतले आणि तो निघून गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही तो परतलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार पांढरी येथून पोलिसांनी आरोपी हिवराज याला अटक केली. तसेच त्याच्याकडून 25 हजार रुपये रोख व मोटारसायकल जप्त करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close