मुलाला स्कूलबसमध्ये बसवून घरी निघाली तेवढ्यात बाईकवरून आलेल्या दोघांनी…

Thane Crime : मुलाला स्कूलबसमध्ये बसवून घरी निघाली तेवढ्यात बाईकवरून आलेल्या दोघांनी...उल्हासनगर | 13 ऑक्टोबर 2023 :  एक धक्कादायक घटना शहरात सकाळी-सकाळी घडली आहे.मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी परतणाऱ्या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. घराच्या दिशेने ही महिला निघाली असता, बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील चेन हिसकावली  आणि क्षणात वायूवेगाने ते पसार झाले. त्या महिलेने त्यांना रोखण्याच प्रयत्न केला मात्र काहीच उपयोग झाला नाही.

दुचाकीवरून पळताना चोरटे सीसीटीव्हीत कैदउल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात ही घटना घडली. या परिसरात राहणारी मेहेक ही महिला मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता मुलाला स्कूलबस बसवण्यासाठी आली होती. त्याची बस गेल्यानंतर त्याही घराच्या दिशेने निघाल्या. मात्र त्याचवेळी त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातली अडीच तोळे वजनाची सोनसाखळी खेचली ते आणि फरार झाले. मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पीडित महिलेने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानतंप पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे या सोनसाखळी चोरांचा शोध सुरू केला आहे

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close