
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसात दुसऱ्यांदा दिल्लीत
मुंबई | दोन दिवसाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले होते. तिथे त्यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. अमित शाह यांनी उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत.
आज आणि उद्या बैठकाअमित शाह यांनी उद्या एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला निघाले आहेत. आज गृहविभागाच्या सचिवांसोबत त्यांची बैठक होईल. अमित शाह यांनी याबाबत थोड्या वेळा पूर्वी केलं आहे.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कालच पालकमंत्रिपदाचं वाटप झालेलं आहे. यात अजित पवार गटाला सात जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. यावरही या भेटीत चर्चेची शक्यता आहे.
राज्यातील सध्या युती सरकारमध्ये सारं अलबेल नसल्याची चर्चा आहे. अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अशातच परवा म्हणजे तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. त्यातच आता आज मुख्यमंत्री शिंदे पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दोन दिवसात होणारी ही दुसरी भेट आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Live Cricket
Live Share Market


