
महीला सक्षमीकरणाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करा
महीला सक्षमीकरणाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करा
अनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: बहुजन आघाडी दिग्रस ची मागणीवंचित बहुजन आघाडी दिग्रस च्या वतीने गटविकास अधिकारी खारोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.राज्य शासनाने महीलांचे सक्षमीकरण व्हावे या राता महिला सक्षमीकरणांचा निर्णय घेतला परंतू आपल्या तालुक्यात या निर्णयाची पायमल्ली होतांना दिसत आहे. ग्राम पंचायत सरपंच तथा सदस्य महिला असतांना त्यांचेनातेवाईक,मंडळीच त्यांचे काम पाहतात त्यामुळे या निर्णयाची पायमल्ली होत असून ग्राम पंचायत सदस्य तथा सरपंच असणाऱ्या महिलांच्या घरच्या पुरुषांचा ग्रा.पं.मध्ये होणारा हस्तक्षेप थांबवावा असे निवेदन देण्यात आले.यावेळी दिग्रस तालुका कार्याध्यक्ष अमोल मनवर, के. टी. जाधव सर तालुका महासचिव संजय मुजमुले दिग्रस शहर अध्यक्ष शेख रफीक भाई मोख आरंभी सर्कल प्रमुख पुरुषोत्तम बोरकर, धम्मपाल बोडखे. किशोर जाधव महिला आघाडी च्या सुजाता चक्रणारायन.वर्षाताई कांबळे माधुरी लोखंडे बिडवारे ताई सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते .



